Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवमध्ये 'सुरों की शाम' संगीत मैफलीचे आयोजन

धाराशिवमध्ये 'सुरों की शाम' संगीत मैफलीचे आयोजन

धाराशिव : सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेब आणि किशोरकुमार यांच्या गाण्यांना समर्पित 'सुरों की शाम' या भव्य संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. तोफिक शेख (अपनी आवाज म्युझिकल ग्रुप) आणि प्रभाकर चोराखडीकर (कलाविश्व ग्रुप, धाराशिव) यांच्या पुढाकाराने धाराशिव मध्ये हा कार्यक्रम मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव (उस्मानाबाद) येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार असतील. तसेच डॉ. मैनाक घोष (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव), श्रीमती शोभा जाधव (निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव), श्री. टी. के. डेंगळे पाटील (जिल्हा सहाय्यक आयुक्त, नगर परिषद), आणि श्रीमती नीता अंधारे (मुख्य अधिकारी, धाराशिव नगर परिषद) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मैफलीत प्रख्यात गायक-गायिका आपल्या सुरेल आवाजात रफी साहेब आणि किशोरकुमार यांच्या अमर गीतांचा संगम घडवणार आहेत. कार्यक्रमात धाराशिव शहरातील व परिसरातील संगीत प्रेमी कलाकार सहभागी होणार आहेत.

प्रेक्षकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून पाससाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी ही मैफल एक अविस्मरणीय सुरेल मेजवानी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement