Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर–धुळे महामार्गावर श्रद्धेच्या प्रवासात ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकाचा अपघात एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

 सोलापूर–धुळे महामार्गावर श्रद्धेच्या प्रवासात ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकाचा अपघात
 एकाचा मृत्यू  एक जण गंभीर जखमी

वाशी (सोलापूर–धुळे महामार्ग) :
तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन युवकांचा कान्हेरी पाटी भागात अपघात झाला. मोटारसायकल घसरल्याने झालेल्या या घटनेत दीपक काळे (रा. बकरवाडी, ता.जि बीड) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले प्रवीण गाडे (रा. बकरवाडी, जि. ता बीड) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या अपघाताची वार्ता कळताच भाविक भक्तामध्ये शोककळा पसरली. श्रद्धेच्या प्रवासात एका कुटुंबाचा आधार हरपल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले आहेत.

युवा मशालचे आवाहन :
“भाविकांनो, ज्योत आणताना सुरक्षिततेची काळजी घ्या. हेल्मेट वापरा, वाहनाचा वेग कमी ठेवा आणि सावधपणे प्रवास करा. दीपक काळे यांचा मृत्यू आणि प्रवीण गाडे यांची अवस्था हा आपल्या सर्वांसाठी मोठा धडा आहे. तुमचे आयुष्य हेच तुमच्या घरासाठी खरी ज्योत आहे.”

🙏 दीपक काळे यांच्या निधनाने श्रद्धाळू भाविकांमध्ये दुःखाचे सावट पसरले असून, प्रवीण गाडे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement