वाशी (प्रतिनिधी
काझी शहाबाज)
वाशीतील कु. ऋतुजा रामभाऊ जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) झालेल्या संयुक्त गट-ब परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) व राज्य कर निरीक्षक (STI) या दोन्ही पदांवर पात्रता मिळवली आहे. तिच्या या दुहेरी यशामुळे वाशी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋतुजा हिचे वडील आर.आर. जाधव (रामभाऊ जाधव) हे वाशी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शिक्षकी जीवनातील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा हे गुण ऋतुजाच्या आयुष्याला बळ देणारे ठरले. तिची आई सौ. सावित्रीबाई यांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन, त्याग व मार्गदर्शन या यशामागील मोलाचे आधारस्तंभ मानले जात आहेत.
स्थानिक समाजातील अनेकांनी ऋतुजाच्या या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त करताना, तिच्या परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे मिळालेला हा सन्मान असल्याचे नमूद केले. वडिलांच्या शैक्षणिक वारशासह आईच्या जिद्दीचा वारसा घेऊन ऋतुजाने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
ऋतुजा जाधव हिने पुढील काळात कुटुंब, समाज आणि वाशी गावाचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1 Comments
Very nice and great achievement congratulations sir and rutuja mam also
ReplyDelete