धाराशिव : माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शेख सत्तार (सेठ) यांची सून समीरा आमेर शेख यांनी प्रभाग क्रमांक 17-B मधून काँग्रेस पक्षाकडून दि. 15 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला.
समीरा शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज जमा केला.
आपला राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने समीरा शेख यांनी निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वर्गीय शेख सत्तार यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळात झालेली विविध विकासकामे आणि समाजकारणाबद्दल नागरिक समाधानी असल्याचे प्रभागात मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत समीरा आमेर शेख यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळेल, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
समीरा शेख यांचा अर्ज दाखल झाल्याने प्रभागातील निवडणुकीची चुरस वाढली आहे.
अर्ज दाखल करताना शेख जलील शेख गफार शेख मुख्तार शेख सुलेमान शेख अल्ताफ शेख मैनु शेख फेरोज शेख असलम सादिक सौदागर शेख मुक्तदिर साहेब पठाण जैनुद्दीन शेख हाफिज शेख अमन शेख मुस्ताक शेख तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments