जवळा खुर्द (ता. कळंब), दि. ७ नोव्हेंबर :
हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड, जवळा खुर्द येथे आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ आणि ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ धार्मिक उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. प्रकाशजी बोधले महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील सर्व शेतकरी बांधव, वाहतूक व तोडणी ठेकेदार तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ आदित्य (भैय्या) पाटील, सुभाष कल्याणकर, साहेबराव देशमुख, सुभाष देशमुख, अमोल पाटील (सरपंच खामसवाडी), राजाभाऊ मुंडे, पप्पू मुंडे, विजय देशमुख, साखरे आप्पा, अमरसिंह देशमुख, सोमेश बगॅस, मालकरी साहेब, अमोल शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य पाटील म्हणाले की,
“शेतकऱ्यांना योग्य दर व वेळेवर मोबदला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक पंधरवड्याला शेतकऱ्यांचे ऊस बिल काढण्याचा आमचा मानस आहे,” असे ते म्हणाले.
तर हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“जिल्ह्यातील सर्व गुळ कारखाने जो भाव देतील, तोच भाव हातलाई शुगर देणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि ऊस उत्पादन वाढीसाठी आम्ही एआय (Artificial Intelligence) अॅप्लिकेशनद्वारे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहोत,” असे ते म्हणाले.
यंदाच्या गळीत हंगामात तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले असून, सर्व कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“या युनिटची उभारणी आमचे मार्गदर्शक अण्णा यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, या भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमानंतर कारखान्याच्या मोळीपूजनाचा कार्यक्रम विधीवत पार पडला. उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments