धाराशिव :
भारतीय हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने सांगितले की, काही भागात जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मंत्रालयाकडूनही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, वेळोवेळी सूचना जारी करण्यात येतील.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, ओढ्याजवळ अथवा नद्यानदीच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क:
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा.
— ‘शेख जाफरोद्दीन रब्बानी (युवा मशाल प्रतिनिधी )
0 Comments